अझीम प्रेमजी, विप्रोतील 53 हजार 284 कोटी रुपयांची संपत्ती दान

अझीम प्रेमजी, विप्रोतील 53 हजार 284 कोटी रुपयांची संपत्ती दान

आयटी क्षेत्रातील दिग्गज अझीम प्रेमजी यांनी आपल्या विप्रो सॉफ्टवेअर कंपनीतील सुमारे अर्धी संपत्ती समाजसेवी संस्थेच्या नावावर केली आहे. विप्रो ही देशातील तिसरी सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा देणारी कंपनी आहे.

विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी कंपनीतील आणखी 18 टक्के भागीदारी समाजसेवी संस्थेच्या नावावर केली आहे. अशाप्रकारे त्यांनी 39 टक्के भाग समाजसेवी संस्थेच्या नावे करुन नवा आदर्श उभा केला आहे. या शेअर्सची एकूण किंमत 53 हजार 284 कोटी रुपये आहे.

प्रेमजी यांच्या निर्णयामुळे अझीम प्रेमजी ट्रस्टला या माध्यमातून यावर्षी 530 कोटी रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.

विशेष म्हणजे अब्जाधीश गुंतवणूकदार वॉरेन बफे आणि मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी आयोजित केलेल्या गिव्हिंग प्लेजवर स्वाक्षरी करणारे अझीम प्रेमजी पहिले भारतीय आहे. या उपक्रमाअंतर्ग जगभरातील श्रीमंत व्यक्तींनी स्वत:च्या संपत्तीमधील काही भाग समाजासाठी दान करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

एका चांगल्या समाजाची निर्मिती करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी सतत योगदान द्यायला हवं. ही नैतिक शक्तीच आपली खरी ताकद असल्याचं अझीम प्रेमजी यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *