शिर्डी मंदिर सुरक्षारक्षकाला पोलिसाची मारहाण

शिर्डीमध्ये साईबाबांच्या दरबारी पोलीस कसे मुजोरी करतात, याचं उदाहरण आज पाहायला मिळालंय. साईमंदिर परिसरात सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस उपनिरीक्षक विजय टिकोळे त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीला व्हीआयपी गेटनं आत घेऊन चालले होते.

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या लाल शर्टातल्या व्यक्तीला ते आत घेऊन चालले होते. त्यावेळी संस्थानाचे सुरक्षा रक्षक वाल्मिक नाजीरे यांनी त्यांना पास दाखवण्याची विनंती केली. सुरक्षा रक्षकानं पास मागितल्याचा पोलीस उपनिरीक्षकांना राग आला, आणि त्यांनी या सुरक्षारक्षकाला मारहाण केली.

शिवाय जबरदस्तीनं ओळखीच्या व्यक्तीला मंदिरात घुसवण्याचा प्रयत्न केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *