अकोला-मूर्तिजापूर महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत दोन जणांचा जागीच मृत्यू

ट्रकने बाईकला दिलेल्या धडकेत 2 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जागीच ठार झाल्याची घटना बुधवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली.  आपताबोद्दीन कलिमोद्दीन (वय 17 वर्ष) आणि मुज्जमिल शेख सत्तार (वय 20 वर्ष) अशी मृतांची नावं आहेत.

हे दोघंही बाईकनं नवीन वस्तीकडे निघाले होते. यादरम्यान, अमरावतीहून अकोल्याकडे जाणा-या भरधाव ट्रकनं त्यांच्या बाईकला जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत दोघांचाही जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला. पुढील चौकशी सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *