चंद्रपूरात ६५ लाख रुपयांचा मोहफुलांचा साठा जप्त…

चंद्रपूरात 65 लाख रुपयांचा मोहफूलाचा साठा जप्त करण्यात आला आहे. चंद्रपूर पोलिसांनी सावली तालुक्यातील किसाननगरच्या जंगलात राबवलेल्या विशेष मोहिमेत हा साठा जप्त करण्यात आला आहे.

या भागात हातभट्टीच्या दारुसाठी अवैध मोहफूलाची साठवणूक केल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिका-यांच्या विशेष पथकानं या जंगलात खास अभियान राबवलं. यात 5 मोठ्या भट्ट्या उध्वस्त करण्या आल्या. तर ३२ हजार २०० लिटर मोहफूल सडवा जप्त करण्यात आला. या साहित्याची एकूण किंमत ६४ लाख ४० हजार रुपये इतकी होती. या कारवाईमुळे अवैध दारु व्यवसायिकांचे धाबे दणाणलेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *