कोपर्डी प्रकरण : अंतिम सुनावणीला सुरुवात

संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या कोपर्डी खटल्याच्या अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात ही सुनावणी होईल.

जुलै 2016 मध्ये कोपर्डीमध्ये पिडीत मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी आरोपी जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे आणि संतोष भवाळ यांच्यावर कटकारस्थान करुन बलात्कार आणि हत्या केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय.

या संदर्भात विशेष सरकारी वकील उज्वल निकम प्रथम युक्तीवाद करतील. घटना घडल्यानंतरचा घटनाक्रम, साक्षीदार आणि वैद्यकिय अहवाल या मुद्यांवर युक्तीवाद होणार आहे. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या खटल्याचा निकाल लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *