हिमाचलमध्ये अडकलेल्या जखमी अमेरिकन नागरिकाची भारतीय लष्कराकडून सुटका

हिमाचल प्रदेशात १५ हजार फूट उंचीवर अडकलेल्या एका अमेरिकन नागरिकाची भारतीय लष्कराने सुटका केल्याची माहिती समोर आली आहे. बॅरी रॉबर्टस् असे या पॅरा ग्लायडरचे नाव आहे अशीही माहिती समजली आहे. कांगा जिल्ह्यातील बजीनाथ येथील तळापासून १५ हजार फूट उंचीवर बॅरी खडकांमध्ये अडकला होता. तो गंभीर जखमीही झाला होता.

पॅरा ग्लायडिंगचा छंद असल्याने बॅरी या ठिकाणी आला होता. मात्र तो खडकांमध्ये अडकला आणि जखमी झाला. त्याच्या या अवस्थेची माहिती ‘आयइआरसीसी’ने (इंटरनॅशनल इमर्जन्सी रिस्पॉन्स कोऑर्डिनेशन सेंटर) दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अधिकाऱ्यांना दिली आणि त्याच्या सुटकेची विनंती केली. ज्यानंतर भारतीय सैन्य दलातर्फे त्याचा शोध सुरू करण्यात आला. लष्कर हेलिकॉप्टरच्या मदतीने बॅरीला सोडवण्यात आले. सध्या बॅरीला दिल्ली या ठिकाणी आणण्यात आले असून रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *