पुणे: अडीच वर्षाच्या चिमुरडीची अपहरण करून हत्या

विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे पुणे हादरून गेले आहे. पुण्यात अडिच वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिची हत्या करण्यात आली आहे. घटनेचे वृत्त समजताच पुणे शहरात सन्नाटा पसरला.

श्रुती विजय शिवगणे असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. पुणे शहरातील धायरी परिसरात ही घटना उघडकीस आली.प्राप्त माहितीनुसार शनिवारी रात्री १२च्या सुमारास श्रृती बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी त्याबाबत सिंहगडरोड पोलीस स्थानकात तक्रारही दिली होती.

दरम्यान, पोलिसही श्रृतीचा शोध घेत होते. मात्र, रविवारी श्रृतीचा मृतदेह प्रयेजा सिटीच्या मागे आढळून आला. पोलीस घटना स्थळी पोचले असून तपास सुरु आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *