प्रसिद्ध गायिका-डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या

हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यात दोन अज्ञातांनी प्रसिद्ध हरियाणवी लोकगायिका आणि डान्सर हर्षिता दहियाची गोळ्या झाडून हत्या केली. एका कार्यक्रनाहून घरी परतताना तिच्यावर हा हल्ला झाला.

दोन हल्लेखोरांनी फोर्ड फिगो कारमधून हर्षिताचा पाठलाग केला. सायंकाळी ४.३० वाजता पानीपतमध्ये एका जागी कार उभी केली.

हल्लेखोरांनी ड्रायव्हर आणि हर्षिताच्या तीन साथीदारांना गाडीबाहेर काढले. त्यानंतर हर्षिताला अगदी जवळून डोक्यात चार गोळ्या झाडण्यात आल्या. त्यामुळे तिचा जागेवरच मृत्यू झाला. हर्षिताला अनेक दिवसांपासून फोनवरून धमक्या दिल्या जात होत्या. याची माहिती तिने फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चाहत्यांना दिली होती.

यासोबतच हर्षिताने फेसबुकवर एक फोटोही शेअर केला होता. त्यात प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीसोबत एक व्यक्ती दिसतोय. ज्याने तिला धमकी दिल्याचे तिने सांगितले होते.

पोलिसांनी या हत्येमागे दोन कारणे असल्याचा संशय आहे. एकतर तिने तिच्या बहिणीच्या नव-यावर बलात्काराचा आरोप लावला होता. तो सध्या तुरुंगात बंद आहे. तर दुसरं प्रकरण हर्षिताच्या आईच्या हत्येशी निगडीत आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *