हातपाय तोडण्याची धमकी देऊन मुलीचा विनयभंग…

अकोल्यातील मुल्लानी चौकात एका मुलीला तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी देऊन विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

मुल्लानी चौकातील रहिवासी रमजान खान सोदाब खान याने याच परिसरातील एका मुलीला स्वत:च्या घरात नेले, त्यानंतर मुलीचा विनयभंग केला. मुलीने विरोध करताच खान याने तिच्या वडिलांचे हातपाय तोडण्याची धमकी दिली. मुलीने कशीबशी या नराधमाच्या तावडीतून सुटका केली, त्यानंतर खदान पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रमजान खान याच्याविरुद्ध गुन्हा करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *