ठाणे जिल्ह्यात नुकतेच लग्न झालेल्या जोडप्याने विष पिऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये चांदणी सिंग (१९) या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर प्रदीप शर्मा याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात हे दोघे राहत होते. हे जोडपे बिहारमधील बबुआ शहरातील रहिवासी असल्याची माहिती कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक कल्याणजी गेते यांनी दिली.
या जोडप्याने आपल्या कुटुंबियांच्या विरोधात जावून लग्न केले होते. त्यांचे नातेवाईक डोंबिवलीतील राहणारे आहेत. त्यांनी आत्महत्या का केली, हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

