विद्यार्थ्यांच्या पाठदुखीसाठी शाळेचे बेंचही जबाबदार

गेल्या काही वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांमध्ये पाठदुखी,मानदुखीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. याआजारांसाठी पाठीवरील दप्तर जबाबदार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर ते कमी करण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्र विद्यार्थ्यांना होणा-या या त्रासासाठी केवळ दप्तराचे ओझेच कारणीभूत नाही तर शाळेतील त्यांची आसनव्यवस्थाही तितकीच जबाबदार आहे.

शाळांतील सर्व बेंचेस हे एकाच आकाराचे असतात. मात्र काही मुले उंच तर काही मुले स्थूल असतात त्यामुळे एकाच आकाराच्या बेचेंसवर बसण्यात या मुलांना समस्या येते. यामुळेच पाठदुखी, मानदुखीसारखे आजार उद्भवतात.

शाळांच्या वर्गातील बेंचेस, खुर्च्या तसेच तासनतास टॅब्लेट आणि कम्प्युटर्सच्या समोर बसून राहणे हे विद्यार्थ्यांच्या पाठदुखी तसेच मानदुखीसाठी कारणीभूत ठरतात. शालेय विद्यार्थ्यांमध्ये तब्बल ९० टक्के पाठदुखीची समस्या शाळेतील आसनव्यवस्था नीट न असल्यामुळे तसेच टॅब्लेट आणि कम्प्युटर्ससमोर वाकून बसल्यामुळे उद्भवत असल्याचे समोर आले आहे.

फिजिओथेरपिस्ट डॉ. गरिमा आनंदानी यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्यांच्या पाठदुखीसारख्या समस्यांसाठी केवळ त्यांचे दप्तराचे ओझेच कारणीभूत नाही तर आठ ते दहा वयोमानांतील मुलांमध्ये मान आणि पाठदुखीची समस्या अनेकदा शाळेतील नीट नसलेल्या बेंचेसमुळे तसेच तासनतास टॅब्लेट आणि कम्प्युटर्ससमोर बसल्याने उद्भवते.

एकीकडे दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहेत मात्र त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या या त्रासाला कारणीभूत असणा-या आसनव्यवस्थेबाबत सरकारकडे कोणतीही नियमावली नाही.

मुलामध्ये पाठदुखीची समस्या निर्माण करणारी कारणे

अयोग्य आसनव्यवस्था – शाळेतील अयोग्य आसनव्यवस्थेमुळे मुलांना पाठ, मानदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. शाळांतील सर्व बेंचेस हे एकाच आकाराचे असतात. मात्र काही मुले उंच तर काही मुले स्थूल असतात त्यामुळे एकाच आकाराच्या बेचेंसवर बसण्यात या मुलांना समस्या येते.

टॅब्लेट आणि कम्प्युटर्सचा वापर – तासनतास टॅब्लेट आणि कम्प्युटर्ससमोर वाकून बसल्याने मुलांमध्ये ही समस्या उद्भवते.

लॉकर्सची व्यवस्था – शाळांमध्येच लॉकर्सची व्यवस्था केल्यास त्यांना अतिरिक्त वह्या पुस्तके त्या लॉकर्समध्ये ठेवता येतील. रोजच्या रोज त्याची ने आण करण्याची गरज भासणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *