ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर

राज्यातील एसटी कर्मचारी संपावर जाणार असल्याची घोषणा महाराष्ट्र काँग्रेस इंटक संघटनेने केली.

एसटी कर्मचाऱ्यांना पुरेसे वेतन मिळत नसून सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळावी अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली होती. मात्र सरकर मागणी मान्य करत नसल्याने १७ ऑक्टोबरपासून सर्व कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी दिली.

इतर राज्यात एसटी तोट्यात असली तरी कर्मचाऱ्यांना योग्य वेतन दिले जाते. मात्र आपल्याकडे तसे होत नाही. मागण्या मान्य न झाल्यास कर्मचारी बेमुदत संपावर जाणार असल्याच संघटनेने औरंगाबादेत झालेल्या प्रादेशिक बैठकीत स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *