धक्कादायक ! गुंगीचं औषध मिसळून तरूणीवर लैंगिक अत्याचार

कोल्ड ड्रींकमध्ये गुंगीचं औषध  मिसळून तरूणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घडना नागपुरात घडली आहे. गंभीर बाब म्हणजे या गुन्ह्यात तिच्या दोन मैत्रिणींचाच सहभाग असल्याचं उघड झालं आहे. पीडित तरूणी नागपुरात एका कॉल सेंटरमध्ये काम करते.

नागपूरच्या मनकापूर भागातल्या एका फ्लॅटमध्ये १० सप्टेंबरला तिला तिच्या दोन मैत्रिणींनी नेलं. कोल्ड्रींकमध्ये गुंगीचं औषध मिसळून तिला बेशुद्ध करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाला. हा प्रकार संध्याकाळी तरूणीच्या लक्षात आल्यावर तिने मैत्रिणींना जाब विचारला.

मात्र तोंड बंद ठेवण्याबाबत मैत्रिणींनी तिला धमकावलं. पीडित मुलगी गप्प बसली. पण त्यानंतर वारंवार मुलीला तिथे येण्यासाठी फोन येऊ लागल्यावर तिने तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी महिलांना अटक केलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *