पाकिस्तानकडून नापाक हरकती सुरुच आहे. जम्मू-काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये पुन्हा एकदा पाकिस्तानमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न झाला. जवानांनी घुसखोरीचा हा प्रयत्न हाणून पाडला. या कारवाईत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आलं. जवानांकडून सर्च ऑपरेशन अजून सुरु आहे. उरीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत घुसखोरीचा प्रयत्न सुरु आहे. ऑपरेशन दरम्यान जवानांनी शस्त्रे जप्त केली आहेत. आणखी काही दहशतवादी लपून बसल्याची शक्यता आहे.
