आयटी कंपनी ट्रू कॉलरने ट्रू मेसेंजर हे नवं मोबाईल अॅप भारतात लॉन्च केलं आहे. या अॅपद्वारे तुमच्या मोबाईलवर कोणी एमएमएस केला आहे, हे समजू शकणार आहे. याचसोबत वर्षअॅखेरीस भारतात ट्रू कॉलरच्या युझर्सची संख्या 15 कोटी होईल, असा विश्वास कंपनीला आहे.
ट्रू कॉलरचे व्यवस्थापकीय संचालक अॅलन मामेदी यांनी सांगितलं की, भारत आमची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. अँड्रॉईड प्लॅटफॉर्मवर ट्रू कॉलर अॅप आम्ही पहिल्यांदा भारतात लॉन्च करत आहोत. त्यानतंर हे अॅप इतर देशांमध्ये लॉन्च केलं जाईल. ट्रू कॉलर अॅप आता नव्या अपडेटसह लॉन्च झालं आहे. 5.0 हे अॅपडेट व्हर्जन आयओएस युझरसाठी आहे.
ट्रू कॉलर ग्लोबल फोन डायरेक्टरी आहे. या अॅपमध्ये मोबाईल नंबर टाकल्यास त्याच्याशी संबंधित माहिती मिळते. कॉल आल्यावर तो कोणाचा नंबर आहे, याची माहिती अॅपद्वारे मिळते. अनोळख्या नंबरवरुन कॉल येणाऱ्या व्यक्तीचं नाव आणि स्थळ मोबाईल स्क्रीनवर डिसप्ले होतं.

