पुण्याच्या शारदा गणपती मंदिरात चोरी, ५० तोळ्यांचे दागिने लंपास

पुण्यातील मानाचा गणपती म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या शारदा गणपती मंदिरात बुधवारी पहाटे पडलेल्या दरोड्यात चोरट्यांनी लाखोंचे दागिने लंपास केले आहेत. पहाटे साडेपाचच्या सुमारास हा प्रकार घडला असून ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. गणपतीच्या मुर्तीवरील तब्बल ५० तोळ्यांच्या दागिन्यांची चोरी झाल्याने सध्या या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत भट यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा गणपती मंदिरातून आज पहाटे पाचच्या सुमारास मंदिराची काच फोडून गंठण, दोन चैन आणि हिऱ्याचा नेकलेस असे एकूण 36 लाख रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे. चोरट्याची प्रतिमा सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर पोलिस तपास करत आहेत. विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *