शाळेच्या इमारतीवरून पडून 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू, पवईच्या पवार पब्लिक शाळेतील घटना

साकीनाक्यातील एका शाळेत इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू झाला आहे. हा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. याप्रकरणी सकीनाका पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधीक चौकशी सुरु आहे.

स्वरांग दळवी (6) असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे. जो साकीनाक्यातील पवार पब्लिक शाळेत शिकत होता. सकीनाका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’ ला दिलेल्या माहितीनुसार, दळवी हा पाऊणे अकराच्या सुमारास मधल्या सुट्टीत खेळत होता. खेळता खेळता अचानक तो दुसऱ्या मजल्यावरून खाली कोसळला आणि गंभीर जखमी झाला. शाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याला हिरानंदानी रुग्णालयात हलविले. तेथे डॉक्टरांनी  त्याला तपासून मयत घोषित केले. त्याचे वडील हे भांडूपच्या पवार पब्लिक शाळेत संगीत प्रशिक्षक आहेत.

घटना साकीनाका पोलिसांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्वरांग दळवीचा मृतदेह शवविछेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *