नाशिक-मनमाड रस्त्यावर बुधवारी पहाटे कंटेनर आणि आयशर ट्रकमध्ये समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. तर अन्य एक जण जखमी झाला आहे. पहाटे पाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला.
कंटेनर मालेगावहून मनमाडकडे येत होता, तर ट्रक मनमाडहून धुळ्याकडे जात होता. ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतू मदत पथक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन अपघातग्रस्त वाहने हटविल्यामुळे सकाळपासून वाहतूक सुरळीत चालू आहे.

