सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची दंगामस्ती मुलाच्या जीवावर बेतली आहे.वर्गमित्रांनी केलेल्या मारहाणीत शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना, संगमनेर तालुक्यातील राजापूर इथे घडली. किरण सोनावणे असं या दुर्दैवी विद्यार्थ्याचं नाव आहे. धक्कादायक म्हणजे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या तब्बल 11 मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.
राजापूर येथील नूतन माध्यमिक विद्यालयात हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
काय आहे प्रकरण?
नूतन माध्यमिक विद्यालयातील सातवीत शिकणारे विद्यार्थी दंगा-मस्ती करत होते. यावेळी काही कारणास्तव किरण आणि अन्य विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला. या वादाचं पर्यवसन मारहाणीत झालं. ही मारहाण किरणच्या जीवावर बेतली, असा आरोप किरणच्या आईने केला आहे.
दरम्यान, विद्यार्थी मस्ती करत होते, असंच शाळेनेही म्हटलं आहे.

