लोणावळा- पुणे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी मृतदेह

लोणावळा- पुणे रेल्वे रुळावर सापडला अनोळखी मृतदेह

१६ सप्टेंबर रोजी लोणावळ्याहून पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गाजवळ एक अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला. याच्याकडे कोणतेही ओळखपत्र नसल्याने या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. पुणे लोहमार्ग पोलीस या सदर प्रकरणाचा तपास करीत आहे.

22 वर्षाचा हा तरुण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. गहू वर्ण 5 फूट 4 इंच उंचीचा, कॉटनचा टीशर्ट, काळी पॅन्ट, दाडी आणि केस वाढलेले असं या तरुणाचं वर्णन आहे. आकुर्डी रेल्वे स्थाकापासून किमी 1 ते 70/26 पोलजवळ हा मृतदेह सापडला आहे. याची ओळख पटल्यास पोलिसांना संपर्क करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुरुषोत्तम कर्दाळे, एएसआय, लोहमार्ग पुणे.
संपर्क – 9657019173

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *