जम्मू राजधानी एक्सप्रेसचे डबे रुळावरून घसरले…

गुरुवारी सकाळी नवी दिल्ली स्टेशनवर एक मोठा अपघात टळला असेच म्हणावे लागेल. जम्मू राजधानी एक्सप्रेस दिल्ली रेल्वे स्थानकात शिरताच एक्सप्रेसचा एक डबा रुळावरून खाली घसरला. हा गार्ड कॉम्पारमेंट असल्याचे बोलले जात आहे. परंतु, त्यामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. ही घटना सकाळी सुमारे ६.२० मिनिटांनी घडली.

नॉर्दन रेल्वेचे अध्यक्ष नीरज शर्मा यांनी सांगितले की, जम्‍मू राजधानी एक्‍सप्रेसचा शेवटचा डबा गुरुवारी सकाळी रुळावरून घसरला. गाडी प्लॅटफॉर्म नंबर १५ मध्ये प्रवेश करत होती आणि तेव्हाच ही घटना घडली. ट्रेन जम्मूवरून दिल्लीला येत होती.

मागील आठवड्यात रांची झारखंड राजधानी एक्‍सप्रेसचे इंजिन नवी दिल्ली रेल्वे स्थानकात शिवाजी ब्रिजजवळ रुळावरून घसरले. या घटनेत देखील कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही. त्याचबरोबर उत्तर प्रदेशातील सोनभद्र येथे शक्तिपुंज एक्सप्रेसचे सात डबे रुळावरून घसरले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *