दुसरीतील मुलीला पाडून अंगावर केली लघुशंका

दुसरीत शिकणाऱ्या मुलीला खाली पाडून तिच्या अंगावर लघुशंका करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वाघोली जिल्हा परिषद शाळेमध्ये हा प्रकार घडला आहे. याच शाळेत चौथीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने हा विक्षिप्त प्रकार केला आहे.
मुलगी शौचालयावरून परतत असताना एका मुलाने तिचा हात पकडून खाली पाडले, तर चौथीतील विद्यार्थ्याने तिच्यावर लघुशंका केली. हा प्रकार घडलेला प्रकार पाहण्याचे काम इतर दोन मुले करत होती. या घटनेने मुलगी पार बिथरली होती तसेच घाबरुन कोणीही शिक्षकांना याबद्दल माहिती दिली नाही.

मुलीने घडलेला प्रकार पालकांना सांगितल्यानंतर पालकांनी सोमवारी सकाळी शाळेमध्ये कळविले. दरम्यान लघुशंका करणारा मुलगा सापडला असून, मुलीचे हात पकडणाऱ्या एकाचा व सर्व प्रकार पाहणाऱ्या आणखी दोघांचा शोध शिक्षक घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *