मनोज म्हात्रे हत्येनंतर नगरसेवक पत्नीला धमकी

भिवंडी महानगरपालिका सभागृह नेते काँग्रेस नगरसेवक मनोज म्हात्रे यांची त्यांच्या राहत्या घराखाली हल्लेखोरांना सपासप वार करीत गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली.

या हत्येतील मुख्य आरोपी चुलत भाऊ प्रशांत म्हात्रे व त्याच्या १४ साथीदारांना त्यानंतर ठाणे गुन्हे शाखेने अटक केली. यामधील मुख्य आरोपी प्रशांत म्हात्रेला भिवंडी न्यायालयात पोलीस व्हॅनमधून आणले असता त्याने स्वर्गीय मनोज म्हात्रे यांच्या पत्नी नगरसेविका वैशाली म्हात्रे आणि मुलगी हर्षाली म्हात्रे यांना जीवे मारण्याची धमकी दिली.

शिक्षा झाली तरी चालेल मनोज म्हात्रेला जसं संपवलं तसं तुम्हाला संपवणार, अशी धमकी दिली. याप्रकरणी वैशाली म्हात्रे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *