टोलनाक्यावर कारचालकाकडून टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला

वांद्रे-वरळी सी-लिंकवर कारचालकानं टोल कर्मचाऱ्यावर चाकू हल्ला  केला. टोल देण्यावरुन कारचालक आणि टोल कर्मचाऱ्यामध्ये सुरुवातीला वाद झाला.  त्यानंतर या भांडणातून कारचालाकानं अमोल चव्हाण या टोल कर्मचाऱ्यावर धारदार चाकूनं हल्ला केला.

ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झालीय. जखमी अमोलला लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हल्ला करणा-या चालकाल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलंय. काही ठिकाणी टोल नाका चालकांकडून अरेरावीचे प्रकार होत असल्याचं समोर आलं आहे. मात्र या ठिकाणी कार चालकाकडूनच टोलनाक्यावरील कर्मचाऱ्यांवर हल्ला झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *