एका १७ वर्षीय मुलीवर ओळखीतल्या तीन जणांनी बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कल्याणमध्ये ही घटना घडली असून पोलीस या तिघांचा शोध घेत आहेत.
या अल्पवयीन मुलीला तिच्या ओळखीच्या दोघांनी अनेकदा बहाण्याने घराबाहेर बोलावून तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. त्याचबरोबर, तपासादरम्यान या दोघांनी तिला बियर पाजून बलात्कार केल्याचेही उघडकीस आले आहे. तर तिसऱ्या एकाने या घटनेबाबत तीला खोटी सहानुभूती दाखवत लग्नाचे आमिष देऊन बलात्कार केल्याचेही उघड झाले आहे.
ओम प्रजापती, केतन नाईक व समीर कुरेशी अशी या तीन आरोपींची नावे आहेत. या तीघांविरोधात या पीडीत अल्पवयीन तरुणीने कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या तिघांविरोधात फसवणूक आणि अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
