अंडर १७ टुर्नामेंट खेळणार्या एका भारतीय खेळाडूचा श्रीलंकेतील स्वीमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला आहे.
नरेंद्र सोढा असे या खेळाडूचे नाव होते. तो मूळचा गुजरातमधील सूरत येथे राहत होता.
भारतीय संघ कोलंबोमधील एका रिसॉर्टमध्ये थांबली होती. रिसॉर्ट्च्या स्विमिंग पूलमध्ये १२ वर्षीय नरेंद्रसोबत त्याचे ३ मित्रही होते. मंगळवारी मित्रांसोबत स्वीमिंगचा आनंद घेत होता अचानक त्याला बुडताना पाहून इतरांनी त्याला बाहेर काढले. जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र नरेंद्रचा दुर्देवी अंत झाला होता. या प्रकरणाविषयी पमुनुगमा पोलिस अधिक तपास करत आहे.
भारतीय क्रिकेट संघ श्रीलंकेत विजयी कामगिरी करत आहे. या दौर्यात विराट कोहलीची ५० वी टी २० मॅच होती. विराटच्या नेतृत्त्वाखाली भारताने ३ टेस्ट मॅचची सिरीज ३-० अशी जिंकली. सोबत ५ एकदिवसीय सामनेदेखील ५-० असे जिंकले.
