मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी तो करायचा घरफोड्या

मैत्रिणीसोबत मौजमजा करण्यासाठी चक्क घरफोड्या  करणाऱ्या तरूणाला पुणे पोलिसांनी अटक केलीय.

रणव चांदगुडे असं या १९ वर्षीय आरोपीचं नाव आहे. त्याच्याकडून तब्बल ११ घरफोड्या उघडकीस आल्यात.

पुण्यातील वारजे माळवाडी पोलिसांनी ही कारवाई केलीय. प्रणवकडून ७०७ ग्रॅम सोनं, ९०० ग्रॅम चांदी असा सुमारे १८ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.

 प्रणव एक हुशार विद्यार्थी असून पदवीच्या प्रथम वर्षाला शिकतो. त्याच्यावर यापूर्वीदेखील चोरीचं गुन्हे दाखल आहेत. त्याची एक मैत्रीण असून तिच्यासोबत मौजमजा करण्यावर तो चोरीचे पैसे उडवायचा अशी माहिती पोलिसांनी दिलीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *