जगातील सर्वांत वयोवृद्ध व्यक्ती असलेले जपानमधील साकारी मोमोई (वय 112) यांचे रविवारी मध्यरात्री निधन झाले.
उत्तर टोकियोमधील सईतामा शहरात साकारी मोमोई राहत होते. राईट बंधुंनी विमानाचा शोध लावण्यापूर्वी साकारी यांचा जन्म झाला होता. साकारी यांना गेल्या वर्षी जगातील सर्वांत वृद्ध व्यक्ती म्हणून घोषित करण्यात आले होते. रविवारी रात्री त्यांचे मुत्रपिंड निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते.
गिनेस वर्ल्ड रेकॉर्डमध्ये गेल्या वर्षी त्यांची नोंद झाली होती आणि त्यांना प्रमाणपत्रही देण्यात आले होते. काळ्या रंगाचा सूट, पांढरा शर्ट आणि चंदेरी रंगाचा टाय असा त्यांचा पोशाख असायचा. ते एका महाविद्यालयाचे प्राचार्य होते.

