पोलीस ठाण्यात मुलीने केली मुलाची धुलाई

पोलीस ठाण्यात मुलीने केली मुलाची धुलाई

पोलीस ठाण्यात एका मुलीने मुलाचा चांगलीच धुलाई केली. मुलीला शिवीगाळ केल्याने मुलगी चांगलीच संतप्त झाली. पोलीस अधिकाऱ्यांसमोरच त्या मुलाला बुटाने तुडवून काढले.

या मारहाणीचा व्हिडिओ पोलीस अधिकाऱ्याने केला. हाय व्हिडिओ व्हायरल झालाय. पीलीभीत येथील इंटर कॉलेजच्या समोर अंकित नावाचा मुलगा रोज युणाऱ्या विद्यार्थींसमोर अश्लील भाषेत कमेंट करायचा. तसेच शिवीगाळ करायचा. यामुळे संजना नावाची एक विद्यार्थ्यींनी त्रस्त होती. शनिवारी अंकितने पुन्हा त्रास दिला. यावेळी मुलीने त्याची बाईक रोखत गाडीची किल्ली काढून घेतली. त्याला पकडून पोलीस स्टेशनला घेऊन गेली.

दरम्यान, संजनाने घरी जाऊन याबाबतची माहीती घरी सांगितली. त्यानंतर ती घरच्यांना घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचली. त्यानंतर संजनाने त्या मुलाची चांगलीच धुलाई केली. याचा व्हिडिओ पोलीस अधिकाऱ्यांने केला. हाच व्हिडिओ सोशलमीडियावर व्हायरल झालाय. तर याबाबत संबंधीत मुलावर कडक कारवाई करण्याच ईशारा एसी जे. के. शाही यांनी दिलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *