जम्मू काश्मीरमध्ये पून्हा एकदा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. दहशतवाद्यांनी पोलिसांच्या बसवर हल्ला केला. या हल्ल्यात एक पोलीस शहीद झाला आहे.
जखमी पोलिसांना उपचाराकरीता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी जम्मू-काश्मीर पोलिसांचे जवान आपल्या कॅपच्या दिशेला रवाना झाले. त्याच दरम्यान पोलीस पथकाच्या वाहनाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं आणि गोळीबार करण्यास सुरुवात केली.
यापूर्वीही २६ ऑगस्ट रोजी दहशतवाद्यांनी पुलवामा पोलीस लाईनवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते. तर, भारतीय जवानांनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देत ३ दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
