विक्रोळीत इमारत आणि दरड कोसळून ३ ठार

मुंबई आणि उपनगरात गेल्या २४ तासात मुसळधार बरसलेल्या पावसामुळे विक्रोळी येथे इमारत कोसळून एक जण ठार झाला आहे, तर विक्रोळी भागातच सूर्यानगर येथे दरड कोसळून दोघे जण मृत्युमुखी पडले आहेत. विक्रोळीच्या वर्षानगर भागातली ही दोन मजली इमारत आहे. ती कोसळून एक जण ठार तर दोघे जखमी आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, आज मंगळवारीही पावसाचा जोर कायम राहील असा इशारा मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने दिला आहे. अनेक सखल भागात अद्यापही पाणी तुंबलेले आहे. जेथे अशी धोकादायक ठिकाणे आहेत, तेथे एनडीआरएफचे जवान लोकांच्या मदतीसाठी तैनात करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *