धनगर समाजाचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतोय…

सोलापूर विद्यापीठास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा धडकणार आहे़ यासाठी सोलापूर शहरात सगळीकडे जय मल्हारचा आवाज घुमू लागला आहे़ मोर्चासाठी सकाळपासून धनगर समाज बांधव पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ थोड्याच वेळात या मोर्चाला प्रारंभ होणार असून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे़ यात राजकीयसह इतर क्षेत्रातील नेतेमंडळी व पदाधिकारी दाखल होत आहेत़
दरम्यान, सोलापूर विद्यापीठास अहिल्यादेवी होळकर यांच्या नामांतरासाठी धनगर समाज एकवटला आहे़ जिल्ह्यात संयोजकांनी तालुकानिहाय बैठका घेवून मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील विविध भागातून सोलापूर शहरात धनगर समाज बांधव दाखल होवू लागला आहे़ पुना नाका चौकातील संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास गोल प्रदक्षिणा घालूनच मोर्चेकरी शहरात दाखल होत आहेत़  मोहोळ, बार्शी,करमाळा, माढा, पंढरपूर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर, सांगोला, माळशिरस आदी तालुक्यातील लोक मोर्चासाठी सोलापूर शहरातील पार्क चौकात एकत्र जमू लागला आहे़ साधारणत: दुपारी दोन ते तीन च्या सुमारास हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे़ कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहर पोलीसांनी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे़ वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी मोर्चा मार्गावरील काही मार्ग बंद करण्यात आले असून त्यासाठी वाहतुक शाखेने पर्यायी व्यवस्था निर्माण केली आहे़ शहरात सगळीकडे वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले आहेत़

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *