पुणे वेधशाळेला शरद पवारांनी पाठवलं साखरेचं पोतं

पुणे वेधशाळेला शरद पवारांच्या वतीनं साखरेचं पोतं   पाठवण्यात आलं आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पुणे वेधशाळेत साखरेचं पोतं घेऊन जाणार आहेच.

शरद पवारांनी बारामतीवरुन हे साखरेचं पोतं पाठवलं आहे. गेल्या आठवड्यात शनिवारी पवारांनी बारामतीच्या एका कार्यक्रमात बोलताना हवामानाचा अंदाज खरा ठरला, तर बारामतीची साखर हवामान खात्याच्या
कर्मचा-यांना पाठवेन असं म्हटलं होतं. तो शब्द आज पवारांनी पाळला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *