२००६ लोकल बॉम्बस्फोटातील जखमी पराग सावंतचे निधन

२००६ लोकल बॉम्बस्फोटातील जखमी पराग सावंतचे निधन

जुलै २००६ मध्ये मुंबईत लोकलमध्ये झालेल्या साळखी बॉम्बस्फोटात जखमी झालेले पराग सावंत (३६) यांचे हिंदुजा रुग्णालयात निधन झाले. ते गेल्या नऊ वर्षापासून कोमात होते.

चर्चगेट विरार लोकलमध्ये मीरा रोड येथे बॉम्बस्फोट झाला होता. या बॉम्बस्फोटात जखमी झालेल्या पराग यांना  सुरुवातीला भक्ती वेदांत रुग्णालय दाखल केले होते.  त्यानंतर त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. नऊ वर्षानंतर अखेर मंगळवारी सकाळी पराग यांनी अखेरचा श्वास घेतला.

११ जुलै २००६ मध्ये रेल्वेत झालेल्या बॉम्बस्फोटात अमित सिंग आणि पराग सावंत हे दोघे गंभीर जखमी झाले होते.  अमित सिंग यांचे २०१३ मध्ये फुफ्फुसात संसर्ग झाल्याने जसलोक रुग्णालयात निधन झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *