तब्बल 17 गर्लफ्रेण्डची फसवणुक

एक-दोन नाही तर तब्बल 17 गर्लफ्रेण्डची फसवणुकीच्या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. चीनमध्ये ही घटना घडली.

हुनान भागात राहणारा या व्यक्ती मार्च महिन्यात चर्चेत आला होता. एका अपघातानंतर तो रुग्णालयात दाखल झाला होता. याची माहिती मिळाल्यानंतर सर्व गर्लफ्रेण्ड्स त्याला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये गेल्या आणि त्याचवेळी सगळ्यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

यानंतर सर्व मुलींनी ‘रिव्हेंज अलायन्स’ नावाने एक ऑनलाइन चॅट ग्रुप बनवला होता. मात्र युआनला अटक झाल्यानंतर ग्रुपचं नाव ‘एन्जल्स’ करण्यात आलं.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, संबंधित व्यक्तीने स्वत:ची ओळख मिस्टर युआन म्हणून सांगितली. होती. त्याच्यावर आरोप आहे की, तो दर महिन्यात या मुलींकडून पैसे लुटत असे.

दरम्यान, या व्यक्तीला एका महिलेपासून मुलगा असल्याचं कळतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *