अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले

अपघातानंतर बघ्यांनी मृतदेहावरील दागिने चोरले

मढयाच्या टाळूवरचं लोणी खाणं काय असतं, या वाक्प्रचाराचं संतापजनक दर्शन करमाळा-नगर रस्त्यावर पाहायला मिळालं. अपघातानंतर बघ्यांनी चक्क मयताच्या अंगावरील दागिने चोरले.

करमाळा-नगर रस्त्यावरील कारच्या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आणि तिथे जमलेल्या लोकांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चालकाला रुग्णालयात नेणं तर सोडाच, पण त्याहून घृणास्पद प्रकार केला.

अपघातानंतर काही जणांनी स्टेअरिंग सीटवर पडलेल्या चालकाच्या अंगठ्या पळवल्या. तर काही जण ब्रेसलेट काढण्यात दंग होते. इतकंच नाही तर इतर लोक चक्क गाडीत काही मिळतं याचीही झाडाझडती घेत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *