तुर्भे पूलाखाली दोन तरूणांची हत्या

तुर्भे पुलाखाली दोन तरूणांची हत्या झाली आहे.  पोलिसांना घटनास्थळी दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून दारुची पार्टी झाल्यानंतर अंतर्गत वादातुन त्यांची हत्या झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. संदीप उर्फ बाळा गायकवाड वय २२ वर्ष आणि समीर अस्लम शेख वय २० वर्ष अशी मृतांची नावं आहेत. हे दोघं जण तुर्भेमधील आनंदनगर व हनुमान नगर झोपडपट्टीत राहणारे आहेत. त्यांची दगड़ाने डोक ठेचुन त्यांची हत्या करण्यात आल्याचीही माहिती समोर येते आहे. ठाणे बेलापूर या रहदारीच्या मुख्य मार्गावर ही घटना घडली आहे.  हे दोघंही बिगारी कामगार असल्याचं समजतं आहे.

पोलीस स्टेशनपासून काही अंतरावरच हे ठिकाण असून घटनास्थली दारुच्या बाटल्या सापडल्या आहेत. यावरून त्याठिकाणी रात्री त्यांची दारुची पार्टी झाल्याचं स्पष्ट होतं आहे. मात्र त्यांच्या सोबत कोण होतं ? हत्येचे नेमके कारण काय ? याचा उलगडा झालेला नाही. त्यानुसार याप्रकरणी अधिक तपास सुरु असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रामचंद्र देशमुख यांनी सांगीतले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करुण मृतदेह शव विच्छेदनासाठी पालिका रूग्णालयात पाठवला आहे. तर हत्येचा उलगडा करण्यासाठी विशेष पथके तयार करन्यात आली असुन त्यांच्याकडून मयतांच्या परिचयाच्या व्यक्तिंची चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *