कारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांचा धुमाकूळ, दोघांना मारहाण

कल्याणच्या कारागृहातून पळालेल्या दोघा कैद्यांनी आता बाहेर येऊन धुमाकूळ घालायला सुरूवात केलीय. रविवारी सकाळी हे दोघे कैदी भर दिवसा पळाले.

जेल बाहेर आल्यावर त्यांनी सरवली एमआयडीसी रस्त्यावर दोघांना झोडपून लुटले. डेव्हिड मुरगेश देवेंद्रम आणि मनिकांतम सिल्वराज नाडर  शी पळालेल्या या दोन कैद्यांची नावे असून, या दोघांनाही १५ वर्षे जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आलेली आहे.

तुरूंगातून पळाल्यानंतर त्यांनी सर्वात प्रथम कल्याण-भिवंडी मार्गालगत असलेल्या सरवली एमआयडीसीत घुसून एका दुचाकीस्वाराला झोडपून लुटले. हातातील मोबाईल आणि दुचाकी हिसकावून दरोडेखोरांनी पळ काढला. ही दुकली पनवेलच्या दिशेने पसार झाली.

पनवेलनजीक त्यांनी एका स्कोडा गाडी चालकास धमकावून झोडपले आणि त्याच्या ताब्यातील स्कोडा गाडी हिसकावून घेतली. याच गाडीने त्यांनी पुढे पलायन केल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *