नाशिक-पुणे ही बहुप्रतीक्षित विमानसेवा आजपासून सुरू होते आहे. सी-प्लेनसाठी प्रसिद्ध असलेल्या मेरीटाईम हेली एअर अर्थात मेहेर कंपनीकडून ही विमानसेवा सुरू करण्यात येतं आहे.
दुहेरी प्रवासासाठी पहिल्या आठवड्यात 7 हजार 499 रूपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर 13 जुलैपासून दर वाढणार आहेत. गाडीनं नाशिक-पुणे अंतर कापण्यासाठी साडेचार तास लागतात. तर हेच अंतर हवाईमार्गे फक्त 50 मिनिटांत पार करता येणं शक्य आहे.
अनेक अडचणीनंतर नाशिक-पुणे विमानसेवेला मुहूर्त मिळाल्यानं नाशिककर आणि पुणेकर खुश आहेत. ही विमानसेवा नाशिकच्या औद्योगिक विकासासाठी लाभदायक ठरेल असा विश्वास नाशिकच्या उद्योजकांकडून वर्तवला जातो आहे.

