जम्मू-काश्मीरमध्ये पाच नराधमांनी एका महिलेला विवस्त्र करून तिचा व्हिडिओ बनविल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या नराधमांनी तो व्हिडिओ इंटरनेटवरही अपलोड केला. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली असून, दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. उधमपुरमधील जगानू परिसरात ही घटना घडली आहे.
दुचाकीवरून जाणा-या पिडीत महिलेला या नराधमांनी निर्जन रस्त्यावर अडवले. त्यानंतर तिची छेडछाड काढून, तिला सगळ्यांसमोर विवस्त्र करून तिचा व्हिडिओ बनवला. त्यानंतर हा व्हिडिओ त्यांनी इंटरनेटवरही अपलोड केला.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तिघांना अटक केली. मात्र, यातील दोन आरोपी फरार झाले असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

