भूशी डॅममध्ये अंधेरीतील दोन तरुण बुडाले

भूशी डॅममध्ये अंधेरीतील दोन तरुण बुडाले

लोणावळ्याजवळील भुशी धरणात रविवारी दुपारी दोन जणांचा बुडून मृत्यू झाला. भुपेन भंडारी (२०) आणि अनिकेत हांडे (२०) या दोघांचेही मृतदेह मिळाले असून ते मुंबईतील अंधेरी येथील रहिवासी आहेत.

भुपेन, अनिकेत आणि त्यांच्या कॉलेजचे ११ मित्र असे १३ जण पिकनिकसाठी सकाळी अकराच्या सुमारास भूशी धरण परिसरात आले होते. यावेळी पोहता येत नसताना देखिल भुपेन व अनिकेत पाण्यात उतरल्याने पाण्यात बुडून दुपारी साडेबारा वाजता त्यांचा मृत्यु झाला.

पावसाळा सुरू झाल्याने आठवड्याच्या सुटीत वर्षासहलीचा आनंद लुटण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतात. पोलिसांनी लावलेल्या सुचना फलकांकडे दुलर्क्ष करत युवा पर्यटक उत्साहाच्या भरात धरणाच्या जलाशयात उतरत मृत्युला आमंत्रण देत आहेत.

मागील आठवडाभरातील ही चौथी घटना आहे. मागील रविवार व शुक्रवारी प्रत्येकी एक जण आणि आज दोन जण या धरणात बुडाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *