आमदार रमेश कदम यांची रवानगी कोल्हापूर कारागृहात करण्यात आली आहे. सोलापूर कारागृहात जागा अपुरी असल्यामुळे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. कदम यांच्यासह 57 आंदोलकांना कोल्हापूर कारागृहात हलवण्यात आलं आहे.
सोलापूर : राष्ट्रवादीचे मोहोळचे आमदार रमेश कदम यांना 14 दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मोहोळ कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. आमदार कदम यांच्यासह 57 आंदोलकांनाही न्यायालयीन कोठडीत धाडण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे मोहोळ मतदार संघातील आमदार रमेश कदम यांच्या कार्यकर्त्यांनी मोहोळ पोलिस स्टेशनवर दगडफेक केली होती. आठ दिवसांपूर्वी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान केल्याप्रकरणी आमदार रमेश कदम यांच्यावरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर आज रमेश कदम आणि 57 आंदोलकांना मोहोळ कोर्टात हजर करण्यात आले होते. मोहोळ कोर्टाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलीस अटक करतील म्हणून रमेश कदम शरण आले. मात्र, त्याआधी त्यांनी त्यासंदर्भात वर्तमानपत्रात जाहिरातही दिली होती. त्यानुसार रमेश कदम पोलिसांमोर आत्मसमर्पण करण्यासाठी आले होते. त्यावेळी पोलीस आणि कदमांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची झाली आणि शेवटी आक्रमक झालेल्या कदम समर्थकांनी पोलिस स्टेशनवर दगडफेक केली.

