तुरुंग फोडून सीरियाला पळण्याचा यासिन भटकळचा प्लॅन

तुरुंग फोडून सीरियाला पळण्याचा यासिन भटकळचा प्लॅन

इंडियन मुजाहिदीनचा म्होरक्या यासिन भटकळ सीरियामधल्या इस्लामिक स्टेटच्या संपर्कात असून तुरुंग फोडून पळण्याची त्याची योजना असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे हैदराबादच्या तुरुंगात असूनही त्याला मोबाईल फोन उपलब्ध होता आणि पत्नीशी तो तुरुंगातून पलणार असल्याचं सांगत होता, जे गुप्तचर अधिका-यांच्या लक्षात आलं. यासिनला तुरुंगात मोबाईल कसा मिळाला, त्याचं इस्लामिक स्टेटशी संबंध कसा आला, नक्की काय योजना आहे या सगळ्या बाबी गुलदस्त्यातच आहेत.
मात्र, पत्नी जाहिदाशी झालेल्या संभाषणात मी लवकरच तुरुंग फोडून पळणार आहे त्यानंतर आपण सीरियाला जाणार आहोत असं तो म्हणताना आढळलं आहे. तुरुंगातल्या अनेक कैद्यांना मोबाईल फोन सारख्या सुविधा लाच खाऊन पोलीस पुरवतात हे उघड गुपित आहे. मात्र, यासिनसारख्या खतरनाक दहशतवाद्यालाही या सुविधा मिळत असतिल तर ती चिंतेची बाब मानण्यात येत आहे.
सीरियामधून आपल्याला मदत करण्यात येत असल्याचे यासिनने सांगितल्यामुळे इस्लामिक स्टेट भारतात पोचली आहे का, ती किती खोल रुजलेय, त्यात किती भारतीय सामील आहेत असे अनेक गंभीर प्रश्न यानिमित्तानं उपस्थित झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *