..म्हणून पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित !

..म्हणून पुन्हा एकदा एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक निलंबित !

एन्काऊंटर स्पेशालिस्ट आणि राज्यातील वादग्रस्त पोलीस अधिकारी अशी ओळख असलेले दया नायक यांना पुन्हा एकदा निलंबित करण्यात आलं आहे. वर्षभरापूर्वी बदली होऊनही, नागपूर परिक्षेत्रात रुजू न झाल्यानं दया नायक यांना निलंबित करण्यात आलं. राज्याचे पोलिस महासंचालक संजीव दयाल यांनी हा निर्णय घेतला आहे.

यापूर्वीही दया नायक यांना बेहिशेबी मालमत्ता जमविल्याप्रकरणी 2006 मध्ये निलंबित करण्यात आले होते. सुमारे साडे सहा वर्षे ते निलंबित होते. या प्रकरणाच्या सुनावणीत 2012 मध्ये दया नायक यांना पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. परंतु, दया नायक हे वर्षभरापासून नागपुरात कामावर रूजू न झाल्याने त्यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे.

बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास टाळाटाळ केल्यानं पोलीस अधिकाऱ्याला निलंबित करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

गुन्हेगारी जगतातील कुख्यात गुंडांना यमसदनी धाडणारे दया नायक सामान्य जनतेमध्ये लोकप्रिय आहेत. एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून त्यांची ख्याती होती.

गेल्या वर्षी त्यांची नागपूर परिक्षेत्रात बदली करण्यात आली होती. परंतु दया नायक बदलीच्या ठिकाणी रूजू होण्यास तयार नसल्यानं अखेर त्यांचं निलंबन करण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *