मुंबई मेट्रोने येत्या रविवारी सकाळी साडे आठ ते दुपारी चार दरम्यान मेगाब्लॉक जाहीर केला आहे. सुरक्षा चाचणीच्या कारणासाठी मेट्रोसेवा आठ तास पूर्णपणे बंद राहील. मेट्रो प्रशासनानं याबाबतची माहिती दिली आहे.
आतापर्यंत मेट्रोचा प्रवास सातत्यानं सुरु होता. मात्र येत्या रविवारी मेट्रो बंद असेल. त्यामुळे रविवारी तुम्ही मेट्रोसफरीचा प्लॅन करत असाल, तर तो रद्द करावा लागेल.
यापूर्वी मेट्रोने डागडुजीसाठी आपला पहिला मेगाब्लॉक आठ महिन्यांनी म्हणजे 24 ते 26 जानेवारी या तीन दिवसांत, पहिल्या दोन तासांसाठी घेतला होता. त्यानंतरही मेट्रोने अनेक महिन्यांनी दुसरा मेगाब्लॉक असाच दोन-तीन तासांसाठी घेतला होता. मात्र येत्या रविवारी मेट्रो तब्बल 8 तासांसाठी ब्लॉक घेणार आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने मेट्रोसाठी हा जंबो ब्लॉक म्हणावा लागेल.
