शाहीदने भावी पत्नीला दिली २३ लाखांची अंगठी

शाहीदने भावी पत्नीला दिली २३ लाखांची अंगठी

विवाहाची तारीख निश्चित झाल्यानंतर प्रत्येक तरुण-तरुणीसाठी लग्नापूर्वीचे आणि त्यानंतरचे काही दिवस स्वप्नवत असतात. या दिवसांमध्ये आपल्या जोडीदारावर प्रेमाचा वर्षाव करताना त्याचे मन कुठे दुखावले जाणार नाही ना याची काळजी घेतली जाते.

सध्या बॉलिवूड अभिनेता शाहीद कपूरही अशाच अनुभवातून जात आहे. शाहीद आपली भावी वधू मीरा राजपूतवर प्रेम व्यक्त करताना कुठलीही कमतरता रहाणार नाही याची काळजी घेत असतो. अलीकडेच शाहीदने मीराला एक विशेष अंगठी भेट दिली. ज्या अंगठीची किंमत २३ लाख रुपये आहे.

दिल्लीतल्या एका ज्वेलर्सकडून शाहीदने आपल्या पसंतीने मीरासाठी खास ही अंगठी बनवून घेतल्याची चर्चा आहे. वर्षाच्या अखेरीस विवाहबध्द होणार असल्याचे शाहीद सांगत असला तरी, जून महिन्यात ग्रीसमध्ये या दोघांचा विवाह होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *