‘गे’ मुलासाठी ‘वर’ पाहिजे, मुंबईतील एका आईची जाहिरात

‘गे’ मुलासाठी ‘वर’ पाहिजे, मुंबईतील एका आईची जाहिरात

वर पाहिजे

वय वर्ष 25-40

चांगलं घर हवं

प्राण्यांवर प्रेम करणारा आणि शाकाहारी असावा

जाती किंवा धर्माचं बंधन नाही

मुंबई : मेट्रिमोनियअल वेबसाईट्स किंवा वृत्तपत्रात अशा जाहिराती आपण अनेक वेळा पाहतो. पण वरील जाहिरात लग्नाळू मुलीसाठी नाही तर मुलासाठी आहे. होय, ही जाहिरात एका आईने तिच्या ‘गे’ मुलासाठी दिली आहे.

मुंबईत एका आईचं तिच्या मुलासाठी ‘वर’संशोधन सुरु आहे. पद्मा अय्यर नावाची ही महिला तिच्या 36 वर्षीय हरीश अय्यर या मुलासाठी ‘नवरा’ शोधत आहे. हरीश ‘समलैंगिक’ अर्थात ‘गे’ आहे. भारतात समलैंगिक संबंध गुन्हा असतानाही एका आईने मुलासाठी ‘मुलगा’च शोधण्यासाठी दिलेल्या जाहिरातीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

पद्मा अय्यर 58 वर्षांच्या आहेत आणि मुलाचं लग्न व्हावं अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे त्यांनी वर्तमानपत्रात मुलासाठी ‘वर’ हवा आहे, अशी जाहिरात दिली. समलैंगिक मुलाच्या आईलादेखील इतर आई-वडिलांसारखची त्यांच्या मुलाची काळजी आहे, असं हरीशच्या आईचं म्हणणं आहे.

खरंतर मुलाच्या लग्नासाठी जाहिरात छापण्यासाठी पद्मा अय्यर यांना खुपच धडपड करावी लागली. सुरुवातीला मुलाच्या लग्नासाठी ‘मुलगा’ हवा, ही जाहिरात छापाण्यासाठी कोणीही तयार होत नव्हतं. कारण भारतात समलैंगिक लग्नाला परवानगी नाही. परंतु मुंबईतील मिड-डे या वृत्तपत्राचे संपादक सचिन काळबाग यांनी ही जाहिरात छापली.

हरीश अय्यर हे नाव तसं प्रचलित आहे. हरीश एक प्रसिद्ध एलजीबीटी कार्यकर्ता आहे. तो युनायटेड वे ऑफ मुंबई या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष आहे. इतकंच नाही तर वर्ल्ड प्राईड पॉवरलिस्ट-2013 मध्ये त्याला 71व्या स्थानावर जागा देण्यात आली होती. या यादीत सर एल्टन जॉन, मार्टिना नवरातिलोवा, रिकी मार्टिन यांसारखे प्रसिद्ध लोकांचा समावेश आहे. शिवाय आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातही तो आला होता.

या जाहिरातीचं जगभरात चर्चा सुरु आहे. आता हरीश आणि त्याची आई पद्मा अय्यर यांना विश्वास आहे की त्यांना लवकरच योग्य ‘वर’ मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *