रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं पहाटेपासून घेतली विश्रांती

मुंबईसह उपनगरांना रात्रभर पावसाने झोपडपून काढल्यानंतर सकाळी पावसानं विश्रांती  घेतली.

रात्रीच्या पावसानं मुंबईतील परळ, हिंदमाता, दादर तसेच गोरेगावसह अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचलं होतं… मात्र, पावसानं सकाळी उघड दिल्यामुळे हे पाणी ओसरलं असून वाहतूक हळूहळू पूर्वपदावर येतेय.

मध्य रेल्वेलाही रात्रभराच्या पावसानं फटका बसला. विक्रोळीजवळ ट्रॅकवर पाणी साचलं होतं. त्यामुळे मध्यरेल्वेची वाहतूक सुमारे पाऊण तास उशिरानं सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *