भर पावसात अचानक गाडीनं घेतला पेट आणि…

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वॅगन-आर कार भीषण आग लाग न जळून खाक झाल्याची घटना घडलीय.

मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ही कार कोलाडजवळच्या खांब गावात मुंबईहून महाडकडे जात असताना अचानक हा प्रकार घडला. या गाडीचा क्रमांक  MH 06 AN 2682 असा आहे.

या कारने भर पावसात अचानक पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झालेली नाही. मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाल्याचं दिसतंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *