संत तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज बेलवडीत

संत तुकारामांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण आज बेलवडी येथे पार पडणार आहे.. सणसर येथून पालखी पहाटे सहा वाजता बेलवडीकडे रवाना झाली. बेलवडीत आजचा हा सोहळा अनुभवण्यासाठी पंचक्रोशीतले भाविक बेलवडीत येतात.

तुकोबांच्या पालखीत सामील झालेले, तुळशी वृंदावन घेऊन जाणाऱ्या महिला, वीणाधारी वारकरी, ध्वजधारी वारकरी असे सगळेच वारकरी रिंगणाच्या निमित्तानं तुकोबांच्या पालखी भोवती प्रदक्षिणा घालतात..आणि त्यानंतर शेवटी तुकोबांच्या पालखीचा अश्व रिंगणात सोडला जातो.

हा अश्वही तुकोबांच्या पालखीला प्रदक्षिणा घालतो. संत तुकारामांच्या पालखीचा हा पहिला रिंगण सोहळा आज बेलवडीत पार पडणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *